मनोगत
स्वयंसेवक बंधुनो सप्रेम नमस्कार!!!
सध्या आपण संघ शताब्दीचे जे आठ कार्यक्रम ठरले होते त्याच्या शेवटच्या व महत्वाच्या टप्प्यावर आहोत.
विजयादशमीच्या उत्सवापासून संघ शताब्दीचे कार्यक्रम चालू झाले. विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व स्वयंसेवक शक्ती एकत्रित केली. यामध्ये जुने स्वयंसेवक, सुप्त शक्ती, इतर क्षेत्रात काम करणारे यांना संपर्क करून जोडून घेतले. त्यामुळे विजयादशमीचा उत्सव मोठ्या संख्येने आणि उत्साहात संपन्न झाला.
नंतर या एकत्रित स्वयंसेवकाच्या शक्तीवर आपण गृहसंवादाच्या माध्यमातून घराघरात संपर्क केला व संघ व पंच परिवर्तनाचे मुद्दे समजावून सांगितले. यातून जी सज्जनशक्ती जोडली गेली त्यांना बरोबर घेऊन हिंदुसमेलन मोठ्या उत्साहात पार पाडले.
या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजातील सर्व स्तरांपर्यंत संघाची भूमिका पोहचवली. नंतर प्रमुख जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठीत लोकांना एकत्रित केले व संघ व पंचपरिवर्तनाचे विषयावर चर्चा केली. सामाजिक सद्भाव बैठकाच्या माध्यमातून सर्व ज्ञाती पर्यंत आपण पोहोचलो. युवा व बाल कार्य माध्यमातून आपण या वयोगटापर्यंत पण पोहोचत आहोत. वरील सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पूर्ण समाज ढवळून काढायचा प्रयत्न केला. आता शेवटचा व महत्वाचा कार्यक्रम हा कार्यविस्तार आहे.
शताब्दीच्या सर्व कार्यक्रमाची परिणीती म्हणजे, संघाच्या शाखेमध्ये वाढ. त्यासाठी कार्यविस्तार हा कार्यक्रम.
या साठी प्रत्येक संघ स्वयंसेवकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम आपल्याला वस्तीस्तरावरील विस्तार या विषयावर ज्या बैठका होत आहेत त्याला आपण सर्वांनी उपस्थिती लावणे महत्त्वाचे व अनिवार्य आहे. या बैठकांमधुन आपल्याला विस्तार कार्यक्रमाची पूर्ण स्पष्टता येणार आहे. जो पर्यंत आपल्याला पूर्णपणे हा विषय समजत नाही तो पर्यंत आपण चांगल्या प्रकारे त्याचे क्रियान्वयन करू शकणार नाही.
रक्षाबंधनाचा उत्सव यामधील पहिला टप्पा आहे. रक्षासुत्र बांधताना आपल्याकडून विस्तार सप्ताहात जास्तीत जास्त वेळ देण्याची अपेक्षा आहे याचीपण जाणीव आपण एकमेकांना करून द्यायची आहे. पटावरील प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरी हा विषय पोहोचेल व संघाशताब्दी मधील या महत्वाच्या विस्ताराच्या टप्प्यामध्ये सर्व स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी होतील याची मला खात्री आहे.
आपल्या सगळांच्या सहकार्याने आपण आपल्या सिंहगड भागात २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या संख्येने शाखा लावू असा मला विश्वास वाटतो.
सचिन नागपुरे
भाग संघचालक
सुभाषित
अयोग्य पुरुष: नास्ती, योजकस्तत्र दुर्लभ: ॥
अमृतवचन
आपल्या समाजातील प्रत्येक मनुष्याला जोपर्यंत श्रद्धा आणि विश्वासपूर्वक हिंदू राष्ट्राचा अनुभव येत नाही, तोपर्यंत हे कार्य मी वाढवीत राहीन, असा विचार आपल्या मनात दृढ झाला पाहिजे. संपूर्ण हिंदू समाज संघटित करणे, हे आपले ध्येय्य आहे. इतर सर्व गोष्टी, आपला परिवार, व्यवसाय इत्यादी गौण आहेत. संघाचे कार्य हे इश्वरी कार्य आहे. ते धुंद होऊन केले पाहीजे.
— प. पू. श्री. गोळवलकर गुरुजीबोधकथा
राजसूय यज्ञाचे वेळी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर व दुर्योधन यांची परीक्षा घेतली. त्यांनी प्रथम दुर्योधनाला बोलावले व त्याला सांगितले की, "हस्तिनापूर मधे फिरुन जो अत्यंत सज्जन व्यक्ती दिसेल त्याला घेऊन ये." दुर्योधन दिवसभर शहरात फिरला व परत येऊन श्रीकृष्णाला म्हणाला की, "मला एकही असा गुणी, सज्जन माणूस दिसला नाही. प्रत्येकात काहीना काही वेगवेगळे दुर्गुण आहेतच." तेंव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला बोलाऊन सांगितले की, "शहरात फिरुन सर्वाधिक दुर्जन माणूस शोधून घेऊन ये." युधिष्ठिर पण सर्व शहरभर फिरला व परत येऊन श्रीकृष्णाला म्हणाला, "मी साऱ्या शहरात फिरलो पण कुणीही असा दुर्जन मिळाला नाही. प्रत्येकाजवळ काहीना काही चांगली गुणवत्ता आहेच." तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, "सज्जन व दुर्जन यांच्यात हाच मोठा फरक आहे. दुर्जन व्यक्तिला कोणी चांगला दिसतच नाही तर सज्जन व्यक्तिला कोणी वाईट दिसत नाही."
दिनविशेष
- 4श्रीकृष्ण जन्माष्टमी
- 7उमाजी नाईक जयंती
- 8जैन संत सेना महाराज पुण्यतिथी
- 10पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी
- 14गणेश चतुर्थी
- 16गजानन महाराज शेगांव पुण्यतिथी
- 17मराठवाडा मुक्ती दिन, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
वैयक्तिक पद्य
शील धीरज स्नेह के रथ बैठ कर बढ़ता रहे ॥ धृ ॥
कंटकों के मार्ग में भी धैर्य बल खोवे नहीं
शत्रु जिसका देख साहस हाथ बस मलता रहे ॥ १ ॥
भय कभी खाते ना जो चमकती शमशीर की
संघ के उत्थान हित नित नव चयन करता रहे ॥ २ ॥
हिंदू का हित हो जहाँ तो मौत भी स्वीकार हो
है यह वटवृक्ष अपना फूलता फलता रहे ॥ ३ ॥
काल का दुष्चक्र किंचित् छू नहीं पाता जिसे
जो तिमिर को चीरता दीपक जला हरता रहे ॥ ४ ॥
सांघिक पद्य
वीरव्रती हुंकार भरें ॥ धृ ॥
देता आया सबको पावन, वैभवमय मंगल संदेश
ऋषि मुनियों की उस थातीपर, निशंक मन से ध्यान धरे ॥ १ ॥
विविध रुप है विविध रंग है, धर्म धारणा सबकी एक
स्नेह भरा व्यवहार संवारें, समरस एकाकार वरें ॥ २ ॥
कोई बन्धु अब ना टुटे, सबका स्वत्व जगाएंगे
जय जय गुंजे भारत मा की, उसी के हितमे जिए मरे ॥ ३ ॥